शहरातील रहाटणी फाटा येथे असलेल्या फर्निचरच्या दुकानावरील गोदामाला मंगळवारी दुपारी आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे आजबाजूचे व्यावसायिक आणि रहिवासी यांच्यात घबराट पसरली. आगीचे कारण अद्यापही कळलेले नाही. बातमी मिळताच महापालिकेचे अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून सायंकाळी उशीरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरु होते. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
रहाटणी फाटा येथे फर्निचरच्या दुकानाला आग
Reviewed by ANN news network
on
३/१६/२०२२ ०३:०२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१६/२०२२ ०३:०२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: