महापालिकेत आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासकीय ’राजवट’ सुरू झाली आहे.

महापालिकेत आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासकीय ’राजवट’ सुरू झाली आहे. दि.१४ मार्च २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपली. आणि; आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासकीय ’राजवट’ सुरू झाली आहे. यामुळे मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावर सध्या स्मशानशांतता आहे.पदाधिका-यांचे कक्ष कुलूपबंद झाले आहेत.तेथे काम करणारे कर्मचारी पुढील आदेशाची वाट पहात आहेत. यानंतर आयुक्त राजेश पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, सर्व कामे सुरळीत चालवण्यासाठी समिती स्थापन केली आहे. कामाची जबाबदारी विभागून देणार आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक सोमवारी प्रभागस्तरावरील कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित राहतील. जनतेच्या समस्या ऐकून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करतील.
महापालिकेत आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासकीय ’राजवट’ सुरू झाली आहे. महापालिकेत आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासकीय ’राजवट’ सुरू झाली आहे. Reviewed by ANN news network on ३/१५/२०२२ १२:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".