लोणावळा : वलवण गावानजिक असलेल्या मम्मीज होमली फूडसमोर सोमवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एक मारुती ओम्नी मोटार रस्त्यावरून खाली गेली.
पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने येणारी दुचाकी अचानक या मोटारीच्या समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटारचालकाचे नियंत्रण सुटल्याचे घटना पाहणार्यां्कडून समजते. दुचाकी अचानक समोर आल्याने मोटारचालकाने मोटार शोल्डर लेनवर खाली घेतली असता, ती रस्त्यावरून खाली उतरली. लोणावळा ते मन:शक्ती केंद्रादरम्यान रस्ता एकेरी व अरुंद असल्याने या परिसरात सतत अपघात होत असतात. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे..
वलवण येथे मोटारीला अपघात
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२२ १०:२३:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: