दुधिवरे खिंडीत रस्त्याची दुर्दशा! बांधकाम खाते सुस्त

लोणावळा : लोणावळा पवनानगर रस्त्यावरील दुधीवरे खिंडीतील रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ताची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पवना धरण परिसरात जाण्यासाठी लोणावळ्यातून हजारो पर्यटक दुधीवरे खिंड मार्गे जातात,त्या परिसरातील अनेक गावांना लोणावळ्यात येण्यासाठी या मार्गाचा वापर करावा लागतो. 2018 साली लोणावळा ते पवनानगर व पुढे जवण पर्यत रस्ता काँक्रिटीकरण व काही ठिकाणी डांबरीकरण करण्याचे काम शासनाने सुरु केले होते. ते लोणावळ्यापासून औंढे गावापर्यत बर्याठपैकी पूर्ण झाले आहे. मात्र,दुधीवरे खिंड परिसर ते पवनानगर दरम्यानच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खिंड परिसरात रस्त्याची खडी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. बांधकाम खात्याने हे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
दुधिवरे खिंडीत रस्त्याची दुर्दशा! बांधकाम खाते सुस्त दुधिवरे खिंडीत रस्त्याची दुर्दशा!  बांधकाम खाते सुस्त Reviewed by ANN news network on २/१४/२०२२ १०:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".