पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारोजगार मेळाव्यात 650 जणांना रोजगार मिळाला आहे.
एच.पी.पेट्रोल पंप, पद्मजी पेपर मिल, थेरगाव येथे रविवारी झालेल्या या मेळाव्याचे खासदार बारणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, मधुकर बाबर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, सुरेश राक्षे, सरिता साने, बाळासाहेब वाल्हेकर, विजय साने, रोमी संधू, नाना काळभोर, युवा सेनेचे रुपेश कदम, राजेंद्र तरस, माऊली जगताप, सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, राजेश पळसकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, ,नगरसेवक प्रमोद कुटे,निलेश बारणे, यांच्यासह शरद हुलावळे ,सुनील हगवणे, जांलिदर काळोखे यांनी दिवसभरात मेळाव्याला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला अनेक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नोंदणी करणार्यां ना पुढील काळात नोकरी देण्याची हमी दिली. पुढील महिनाभर या भागातील गरजू तरुणतरुणींनी खासदार बारणे यांच्या कार्यालायत नोंदणी करावी. त्यांना पुढील काळात नोकरी दिली जाणार असल्याचे विश्वजित बारणे यांनी सांगितले.
महारोजगार मेळाव्यात 650 जणांना मिळाली नोकरी
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२२ १०:२२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: