सॅन्डविकच्या सीएसआर फंडातून उभारलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांचे लोकार्पण

पिंपरी : कासारवाडीतील सॅन्डविक कोरोमॉन्ट या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सामाजिक जबाबदारी (सीएसआर)निधीतून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दोन उद्यानात सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे बसविण्यात आली आहेत.त्यांचे उद्घाट्न गुरुवारी महापौर माई ढोरे यांच्याहस्ते झाले. यावेळी यावेळी आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्या करुणा चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, उपायुक्त सुभाष इंगळे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, सँडविक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण आचार्य, अध्यक्ष सुनिल जोशी, सोनाली मुळे, युनिकेअर टेक्नॉलॉजिज् प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद रावल आदी उपस्थित होते. चिंचवड मधील सुदर्शन नगर येथील गोलांडे उद्यान आणि प्रेमलोक पार्क येथील गणेश उद्यान या दोन उद्यानांमध्ये ही संयंत्रे बसविण्यात आली शेजारीच असलेल्या नाल्यातून पाणी उचलून या संयंत्राद्वारे शुद्ध करून त्याचा वापर उद्यानातील झाडांसाठी तसेच स्वच्छतेसाठी केला जाणार आहे. मात्र, हे पाणी पिण्यासाठी वापरता येणार नाही. नाल्यातून वाहणारे सांडपाणी पहिल्या साठवण टाकीत घेऊन ते दुसर्यान टाकीत प्रक्रियेसाठी सोडले जाईल आणि तिसर्यात टप्प्यात प्रक्रिया झाल्यानंतर ते उद्यानासाठी वापरले जाईल अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्यांआनी दिली.
सॅन्डविकच्या सीएसआर फंडातून उभारलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांचे लोकार्पण सॅन्डविकच्या सीएसआर फंडातून उभारलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांचे लोकार्पण Reviewed by ANN news network on २/१०/२०२२ १०:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".