पिंपळे सौदागरमधील कलाकार कट्ट्याला ‘लता मंगेशकर’ यांचे नाव द्या : नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची मागणी

पिंपरी : पिंपळे सौदागरमधील नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी कलाकार कट्टयाला ‘लता मंगेशकर’ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीमहापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. उत्तम प्रकारे विकसित झालेला परिसर म्हणून पिंपळे सौदागर ओळखले जाते. तेथील लनियर गार्डनमधील कलाकार कट्टयाला लता मंगेशकर यांचे नाव द्यावे अशी मागणी काटे यांनी केली आहे. परदेशात अनेक ठिआणी खुले कलामंच असतात त्याप्रमाणेच लिनियर गार्डनमध्ये हा ‘कलाकार कट्टा’ उभारण्यात आला आहे. कला तसेच कलाविषयक उपक्रम आणि खुली नाटके व अभिनय शाळा, तसेच प्रायोगिक कार्यशाळा असलेली रंगभूमी असे स्वरूप असलेला हा कट्टा केवळ पिंपळे सौदागरच नव्हे तर शहराचा आकर्षण बिंदू ठरणार आहे. या कलाकार कट्टयाला स्व.लता मंगेशकर यांचे नाव देण्यासंदर्भात नगरसेवक शत्रुघ्न काटे व आयुक्त राजेश पाटील यांच्यात विस्तृत चर्चा झाली. या संदर्भातील मागणीचे औपचारिक पत्रही शत्रुघ्न काटे यांनी बुधवारी आयुक्तांना दिले. शत्रुघ्न काटे यावेळी म्हणाले की, ’लतादीदींच्या कर्तृवाला साजेसे ठिकाण असलेल्या या कलाकार कट्टयाला त्यांच्या नावामुळे वलय प्राप्त होईल.
पिंपळे सौदागरमधील कलाकार कट्ट्याला ‘लता मंगेशकर’ यांचे नाव द्या : नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची मागणी पिंपळे सौदागरमधील कलाकार कट्ट्याला ‘लता मंगेशकर’ यांचे  नाव द्या : नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची मागणी Reviewed by ANN news network on २/१०/२०२२ १०:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".