पिंपरी : देशाचे संसद भवन म्हणजे 130 कोटी जनतेचे पवित्र मंदिर आहे. या पवित्र ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणारे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भाषण करताना महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षामुळे देशभर कोरोनाचा फैलाव झाला असे वक्तव्य केले. त्यामुळे देशभरातील काँग्रेस प्रेमींमध्ये आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पिंपरी, मोरवाडी येथिल भाजपा कार्यालयासमोर बुधवारी जमले होते. यावेळी शहराध्यक्ष कदम बोलत होते.
यावेळी युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सायली नढे, विश्वास गजरमल,अभिमन्यु दहितुले, निगार बारसकर, उमेश खंदारे, तारीक अख्तर, दिनकर भालेकर, सतिश भोसले, अबुबकर लांडगे, विश्वनाथ जगताप, जेव्हीयर अॅन्थोनी, डॉ. मनिषा गरुड, संजीव झोपे, अयुब खान, प्रियांका मलशेट्टी, भाऊसाहेब मुगूटमल, मिलिंद बनसोडे, इस्माईल संगम, आबा खराडे आदी उपस्थित होते.
यावेळी कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीव्र शब्दात निषेध केला. महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदार, आमदार आणि राज्यातील महापालिकेतील भाजपा नगरसेवकांमध्ये महाराष्ट्राविषयी जर स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा निषेध करीत तात्काळ राजीनामे द्यावेत. काँग्रेसचे सरचिटणीस खा. राहुल गांधी यांनी देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करावी अशी मागणी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करीत पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये ‘नमस्ते इंडीया’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. देशात कोरोनाचा फैलाव होण्यास महाराष्ट्रातील काँग्रेस नाही तर पंतप्रधान मोदी यांचे ‘इव्हेन्ट’ आणि त्यांची चुकीची धोरणे जबाबदार आहेत. देशभर कोरोनाचा फैलाव होत असताना पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ भाजपा विरोधी राज्यांमधील सरकारांना जाणून बुजून त्रास देणारे निर्णय घेऊन हीन दर्जाचे राजकारण करीत आहेत. कोरोनाच्या लसीकरणात देखील भाजपाने राजकारण केले. गुजरातची खरी आकडेवारी जाहिर केली नाही. यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील कोट्यावधी नागरीकांनी शहरे सोडून मुळगावी स्थलांतर केले. यामध्ये देखील हजारोंचा बळी गेला. वर्षभर दिल्लीत शेतकर्यांनी आंदोलन केले यामध्ये देखील अनेक शेतकर्यांचा दुर्देवी अंत झाला. याविषयी एकही सांत्वनाचा शब्द पंतप्रधान मोदी यांनी उच्चारला नाही. मागील सात वर्षातील आपले अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान मोदी बेतालपणे काँग्रेसवर आणि महाराष्ट्रातील जनतेवर आरोप करीत आहेत अशा बेजबाबदार पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी आणि महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्व खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी राजीनामे देऊन आपला स्वाभिमान दाखवून द्यावा अशीही मागणी कदम यांनी केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला. तसेच निगार बारसकर, शहर काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांनीही निषेधाचे भाषण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : कैलास कदम
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२२ ०८:१८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२२ ०८:१८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: