कुणालकुमार यांचा अभिप्राय
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्टसिटी प्रकल्पाचे काम चांगले चालले आहे. राज्यातील पुणे, सोलापूर ही शहरेही विकासकामात आघाडीवर आहेत; असे मत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे स्मार्टसिटी मिशन संचालक, सह सचिव कुणालकुमार यांनी व्यक्त केले.
सोमवारी सकाळी कुणालकुमार यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या एबीडी व पॅनसिटी प्रकल्पांची पाहणी कुणालकुमार यांनी केली. त्यानंतर ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी,
या वेळी बोलताना पिंपरी चिंचवड, पुणे,सोलापूर ही तिन्ही शहरे जुलै 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण करतील, असे वाटते असे मत व्यक्त करत व्हॉटसअप, फेसबुक तसेच प्रिंट मिडीयाच्या माध्यमातून स्मार्टसिटी प्रकल्पांविषयी जनजागृती करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रकल्पाची पाहणी करताना त्यांच्यासोबत पालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहा.मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह पुणे स्मार्ट सिटीचे अधिकारी व सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे काम चांगले
Reviewed by ANN
on
२/०७/२०२२ ०९:४७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: