लोणावळा : भारतरत्न लता मंगेशकर यांना लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सामुदायिक श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कविश्वर, लोणावळा शहर शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब फाटक, युवासेनेचे तालुकाध्यक्ष शाम सुतार, शिक्षण समितीच्या माजी सभापती ब्रिंदा गणात्रा, नगरसेवक देविदास कडू, संध्या खंडेलवाल, सुधिर शिर्के, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजु बोराटी, काँग्रेसच्या महिलाध्यक्षा पुष्पा भोकसे, भाजपाच्या महिलाध्यक्षा योगिता कोकरे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, शिवदुर्ग मित्रचे आनंद गावडे, सुनिल गायकवाड, अरुण लाड, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, प्रवीण वर्तक, मारुती खोले, जयवंत दळवी, प्रफुल्ल रजपूुत, जाकिर खलिफा, शुभम मानकामे आदींसह लोणावळाकर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
लता मंगेशकर यांना लोणावळ्यात श्रद्धांजली
Reviewed by ANN
on
२/०७/२०२२ ०९:४९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: