स्मार्टसिटीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा : खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेत मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात स्मार्टसिटीच्या सुरू असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. स्मार्टसिटीचे कार्यकारी मंडळ आणि ठेकेदार परस्पर सहमतीने गैरव्यवहार करत आहेत. या प्रकाराची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शहरविकास मंत्र्यांना या प्रकरणाची तातडीने नोंद घेण्याचे आदेश दिले. संसदेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट सिटी ही महत्वकांक्षी योजना आहे. देशाच्या 100 शहरात ही योजना राबविली जाते. माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. या कामासाठी केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकार 25 आणि महापालिका 25 टक्के निधी देत आहे. शहरात स्मार्ट सिटीचे चालू असलेले काम टेक महिंद्रा, एल अॅ्ण्ड टी, बी.जी.शिर्के आणि बेनेट कोलमेन या कंपन्या करत असल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. परंतु, प्रत्यक्षात या कंपन्या काम करत नाहीत. या कंपन्यांनी अन्य ठेकेदाराला काम दिले आहे. ते ठेकेदार व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे कामाचा दर्जा योग्य राखला जात नाही. पूर्वीच विकसित असलेल्या भागात स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. स्मार्ट सिटीची कमिटी आणि ठेकेदार मिलीभगत करुन काम करत आहेत. विकास कामे केवळ कागदावर दिसत आहे. प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात चाललेल्या स्मार्ट सिटीतील कामांची पूर्ण निपक्षपातीपणे चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शहरविकास मंत्र्यांना नोंद घेण्याचे आदेश दिले.
स्मार्टसिटीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा : खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेत मागणी स्मार्टसिटीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा :  खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेत मागणी Reviewed by ANN news network on २/१०/२०२२ १०:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".