पिंपरी : गेली सतरा वर्षे राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्या साठी जीवाचे रान केले. त्यासाठी मोठा लढा उभा केला. त्या लढ्याला यशही आले. त्यातून राज्यभरातील 55 हजार रेशन दुकानदारांना सुखाचा घास मिळवून दिला. असे आक्रमक नेतृत्व आज काळाने आपल्यातून हिरावून नेलं. त्यांच्या अकाली जाण्याने संघटना खर्याल अर्थाने पोरकी झाली आहे. आता लढायचं कसं ’’आमचा ढाण्या वाघ गेला हो’’, अशा भावपूर्व शब्दात पदाधिकार्यांनसह राज्यभरातील रेशन दुकानदारांनी स्व. गजानन बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
शिवसनेचे माजी खासदार, ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आकुर्डीतील खंडोबा मंदिर परिसरात रविवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डी सी कटारिया, उत्तर प्रदेशचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मागीराज जाटव, पुणे विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे, माजी नगरसेवक मधुकर बाबर, ऑल इंडिया महासंघाचे काका देशमुख, सुरज बाबर, ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता, ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे उपाध्यक्ष डोळसे पाटील, सेक्रेटरी बाबुराव ममाने, कराड-सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील, ठाण्याचे शंकर सुरवसे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष जयराम मेदणे, अहमदनगरचे देविदास देसाई, सातारचे आप्पासाहेब तोडकरी, नागपूरचे संजय पाटील, जळगावचे मदेश शेलार, केजचे तालुकाध्यक्ष धावरे, पुणे जिल्हाध्यक्ष बाबा पंडित, सिंधुदुर्गचे उमेश धुरी, सांगलीचे दीपक उपाध्ये, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अशोक एडके, कोकण विभाग अध्यक्ष शांताराम पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप तुपे, कापसे महाराज, सोलापूर जिल्हाध्यक्ष नितीन पेंटर, बीड जिल्हाध्यक्ष के के खान, वर्धा जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, नागपूर जिल्हाध्यक्ष सुभाष मुसळे, नाशिक जिल्हाध्यक्ष वंदन बागुल, अहमदनगरचे देविदास देसाई, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अप्पा शेटे, मोहन बाबर, चिंतामणी सोंडकर, शुभांगीताई आणि राज्यभरातून सर्व जिल्यातील रास्त भाव धान्य दुकानदार आणि संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी या शोकसभेस उपस्थित होते.
सूत्रसंचालन शंकरराव आतकरे यांनी केले.
राज्यभरातील रेशन दुकानदारांकडून गजानन बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२२ १०:२६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: