अरुण बोर्हाडे हा श्रमजीवी संस्कृती व शब्दसंस्कृती यांचा सांगाती : डॉ. रामचंद्र देखणे यांचे प्रतिपादन

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये साहित्य, कला आणि संस्कृती रुजविण्याचे आणि फुलविण्याचे काम अनेकांनी केले त्यामध्ये एक सच्चा वारकरी आणि श्रमजीवी संस्कृती व शब्दसंस्कृती यांचा सांगाती म्हणून अरुण बोर्हावडे यांच्याकडे पाहावे लागेल. असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. बुधवारी आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे माजी नगरसेवक अरुण बोर्हााडे यांच्या ‘अरुणगंध’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी देखणे बोलत होते. यावेळी 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष विजय कोलते, ‘अरुणगंध’चे लेखक अरुण बोर्हााडे, गितांजली बोर्हािडे, माजी महापौर संजोग वाघेरे, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, कामगार नेता कैलास कदम, माजी उपमहापौर महंमद पानसरे, विशाल सोनी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, संतोष बारणे, हरिभाऊ सस्ते, मानव कांबळे, संदीप तापकीर, आदी उपस्थित होते. यावेळी देखणे म्हणाले, अरुण बोर्हातडे कामगार चळवळीशी जोडलेले हळव्या मनाचे कवी, लेखक आहेत. हिंदुस्थान अॅ्न्टी बायोटिक्स मधील कामगारांच्या न्याय हक्कांसाठी झुंज देणारा हा कामगारनेता एकीकडे कामगार चळवळीचे प्रभावी नेतृत्व करत होता, तर दुसरीकडे आपल्यातील सर्जनशीलतेने कथा, कविता आणि साहित्याच्या विश्वातही उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती करीत होता. त्यांची साहित्यनिर्मिती म्हणजे, एका श्रमसंस्कृतीने शब्दसंस्कृतीला दिलेले आलिंगन आहे.अरुण बोर्हायडे यांच्या ‘अरुणगंध’मुळे इतर नवसाहित्यिकांना प्रेरणा मिळेल. अरुण बोर्हासडे आणि त्यांच्या पत्नी गितांजली बोर्हा डे यांचा डॉ. देखणे व विजय कोलते यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन दादाभाऊ गावडे यांनी केले. प्रास्ताविक संदीप तापकीर यांनी केले, सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले., आभार श्रीहरी तापकीर यांनी मानले.
अरुण बोर्हाडे हा श्रमजीवी संस्कृती व शब्दसंस्कृती यांचा सांगाती : डॉ. रामचंद्र देखणे यांचे प्रतिपादन अरुण बोर्हाडे हा श्रमजीवी संस्कृती व शब्दसंस्कृती यांचा सांगाती :  डॉ. रामचंद्र देखणे यांचे प्रतिपादन Reviewed by ANN news network on २/१०/२०२२ १०:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".