विनामास्क फिरणार्यांवर आळंदी पोलिसांची कारवाई

आळंदी : कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने आळंदी पोलिसांनी विना मास्क फिरणार्यां ना दंड करण्यास सुरुवात केली आहे. आजवर 100 लोकांवर कारवाई करीत 50 हजार रुपये दंड पोलिसांनी वसूल केलाआहे. आळंदी पंचक्रोशीत विना मास्क फिरू नये असे आवाहन आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांनी केले आहे. खेड तालुका आरोग्य विभागाचे वतीने जाहीर केलेल्या रुग्ण संख्येत आळंदीत शनिवारी 26 रुग्ण आढळले तर शनिवार (दि.15) अखेर आळंदीत 78 रुग्ण असून 5 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आळंदीत एकूण रुग्ण संख्या 2 हजार 473 झाली असून यात 2 हजार 369 रुग्ण बरे झाले आहेत. तर, आळंदीतील 26 रुग्णांचा कोरोनानेे मृत्यू झाला आहे. आळंदी पोलिस,नगरपरिषद प्रशासन, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य सेवा, महसूल प्रशासन तसेच विविध सेवाभावी संस्था तसेच खाजगी रुग्णालये आळंदी कोरोना मुक्त व्हावी यासाठी श्रम घेत असतानाच तिसरी लाट आल्याने अधिक दक्षता घेण्यासाठी म्हणून पोलिस प्रशासनाने विना मास्क फिरणारे नागरीक, वाहन चालक यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.
विनामास्क फिरणार्यांवर आळंदी पोलिसांची कारवाई विनामास्क फिरणार्यांवर आळंदी पोलिसांची कारवाई Reviewed by ANN news network on १/१६/२०२२ ०९:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".