निगडीपर्यंत मेट्रो होण्यासाठी महास्वाक्षरी अभियान

निगडी : स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असतानाच पिंपरीपासून निगडीपर्यंत प्रस्तावित वाढीव मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी आणि निगडी, आकुर्डी प्राधिकरणातील नागरिकांच्या वतीने निगडीमध्ये शनिवारी महास्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून निगडीपर्यंत मेट्रोच्या मागणीला नागरिकांनी पाठबळ दिले आहे. निगडीतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ शनिवारी एक दिवसीय महास्वाक्षरी मोहीम पार पडली. मोहिमेचे उदघाटन पिंपरी चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे, विद्यमान नगसेविका शर्मिला बाबर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित राजेंद्र बाबर, राजेश कडू, विजय तेंडुलकर, प्रसाद जोगळेकर, पोमाराम चौधरी, जगदीश चौधरी, ज्ञानदेव सोनजे, कृष्णा साळवे, अंजली पाटील, शुभांगी समुद्र, ज्योती कानेटकर, पूनम पोळ, नीलिमा कोल्हे, संतोष सायकर, शंकरराव किल्लेदार, विष्णुपंत जातेगावकर, नारायण पांडे, बाबासाहेब दांगट तसेच प्राधिकरण परिसरातील असंख्य नागरिक, विद्यार्थी, कामगार या मोहिमेत सहभागी झाले. नागरिकांच्या स्वाक्षर्याद असलेले एक सविस्तर निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महापालिका आयुक्त आणि पुणे मेट्रोला देण्यात येणार आहे. या प्रकल्पाला गती मिळावी. यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. आपले म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागरिकांच्या मताचा आदर करून सरकारी,. तसेच महापालिका आणि महामेट्रोच्या पातळीवरून निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी, ही अपेक्षा सर्वाची असल्याचे नगरसेविका शर्मिला बाबर यांनी सांगितले.
निगडीपर्यंत मेट्रो होण्यासाठी महास्वाक्षरी अभियान निगडीपर्यंत मेट्रो होण्यासाठी महास्वाक्षरी अभियान Reviewed by ANN news network on १/१६/२०२२ ०९:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".