लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोणावळा शहरात प्रवेश

लोणावळा : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने त्याला आळा घालण्यासाठी ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच लोणावळा शहरात प्रवेश दिला जाणार आहे आणि त्यासाठी लोणावळा शहरातील प्रवेशद्वारांवर तपासणी नाके लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली. मुख्याधिकारी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळा येथील शारदा हॉटेल व वलवण गावातील सेंटर पॉईट येथे सदर तपासणी नाके लावण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी वाहनांमधील नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून तसेच ज्यांची दुसरा डोस घेण्याची मुदत संपल्यानंतरही डोस घेतला नाही त्यांना तात्काळ तपासणी नाक्यावर दुसरा डोस दिला जाणार आहे. याशिवाय कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तपासणी नाका लावत नागरिकांची रॅपिड अँन्टीजन तपासणी सुरु करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले. कोरोना साथरोगाला हद्दपार करण्यासाठी शासनाने हर घर दस्तक मोहिम राबवत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. असे असले तरी अनेक नागरिकांनी अद्याप कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे त्यांना कोरोनाचा आजार जरी झाला तरी असे नागरिक लवकर बरे होत आहेत. याकरिता लसीकरण मोहिम प्रभावी करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. सध्या राज्यात सर्वत्र 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण, 18 वर्षावरील सर्वांना लसीचा पहिला व दुसरा डोस तर फ्रंटलाईन वर्कर व ज्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे त्यांच्याकरिता बुस्टर डोस दिला जात आहे. मावळात कोरोना लसीचा पहिला डोस 120 टक्के नागरिकांनी घेतला. म्हणजेच मावळातील नागरिकांसह तालुक्याबाहेरील नागरिकांनी देखील मावळात लसीचा पहिला डोस घेतला मात्र तब्बल 44 हजार नागरिकांनी मुदत संपल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही.
लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोणावळा शहरात प्रवेश लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोणावळा शहरात प्रवेश Reviewed by ANN news network on १/१६/२०२२ ०९:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".