आळंदी : अण्णा हजारे प्रणित पुणे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी खेड तालुका संघटक सुरेश टाकळकर यांची नियुक्ती झाली आहे. अनेक सेवाभावी संस्था व पदाधिकारी यांनी या निमित्त टाकळकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
टाकळकर यांनी खेड तालुका अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम पहिले असून ते श्री रासोबा शिक्षण प्रसारक मंडळ, टाकळकरवाडी संचलित कै. ज्ञानेश्वर टाकळकर विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या निवडीचे स्वागत खेड तालुका उपाध्यक्ष पै. बाळासाहेब चौधरी,आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष, आळंदी संघटक अर्जुन मेदनकर, आळंदी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोक रंधवे यांचेसह विविध सेवाभावी संस्था, संघटना आदींनी केले आहे.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन जिल्हाध्यक्षपदी सुरेश टाकळकर
Reviewed by ANN news network
on
१/१२/२०२२ ११:१५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: