जिजाऊ या आदर्श माता : महापौर माई ढोरे

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकारण्यासाठी मार्गदर्शन करणा-या जिजाऊ या आदर्श माता होत्या.त्यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य निर्माण केले. असे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी केले. पालिकेच्यावतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, मनसे गटनेता सचिन चिखले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते. महापौर म्हणाल्या स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील परिषदेत बंधूंनो आणि भगिनींनो अशी सुरुवात करुन भारतीय संस्कृतीचा जगाला परिचय दिला. विवेकानंद हे तरुणांच्या शिक्षणासाठी आग्रही असायचे त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात येते असे सांगून तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचा अभ्यास करुन त्यांचा आदर्श जोपासावा असे आवाहन महापौर ढोरे यांनी यावेळी केले.
जिजाऊ या आदर्श माता : महापौर माई ढोरे जिजाऊ या आदर्श माता : महापौर माई ढोरे Reviewed by ANN news network on १/१२/२०२२ ११:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".