आळंदीत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा वार्षिकोत्सव सुरु

आळंदी : येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा वार्षिकोत्सव मंगळवारपासून सुरू झाला आहे. कोठी पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. मात्र कोरोनाचे सावट आणि शासनाच्या अटी शर्ती आणि बंधने पाळावी लागत असल्याने सोहळा अत्यंत साधेपणानेसाजरा होत आहे. केवळ मर्यादित वेळेत भाविकांना श्रींचे दर्शन मिळणार आहे. गर्दी टाळण्यासाठी विश्वस्त मंडळाला यावर्षीचे कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे यावर्षी परंपरेने होणारा रथोत्सव पालखी मिरवणूक, कीर्तन असे गर्दी होणारे कार्यक्रम होणार नाहीत. यावर्षी भाविकांना अन्नदान देखील स्थगित करण्यात आले आहे. उत्सवकाळात सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ६ : ३० यावेळेत श्रींचे मुख दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पौणिमेच्या दिवशी मुखदर्शन सकाळी सात ते सायंकाळी साडेसहा यावेळेत मिळणार आहे.भाविकांचे अभिषेक देखील यावर्षी रद्द करण्यात आले आहेत.
आळंदीत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा वार्षिकोत्सव सुरु आळंदीत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा वार्षिकोत्सव सुरु Reviewed by ANN news network on १/१२/२०२२ ११:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".