पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मुकाई चौक किवळे ते वाकड महामार्ग सेवारस्ता या मार्गावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत १२ टन कचरा उचलण्यात आला.
स्वच्छ भारत मिशनच्या शहर ब्रँड अॅम्बेसिडर प्राजक्ता माळी, पालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, ब - प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या प्रज्ञा खानोलकर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, ब्रँड अॅम्बेसिडर उत्तम गंगावणे यांच्या उपस्थितीत मुकाई चौक बस स्टॉप येथून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना प्राजक्ता माळी यांनी शहर स्वच्छतेमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे नमूद केले.आयुक्त राजेश पाटील यांनी आपले शहर राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात अग्रेसर होण्यासाठी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांना सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले.
प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वाचे स्वागत केले. प्लास्टिक बंदीस प्रोत्साहन देण्यासाठी महिला आर्थिक विकास मंडळाळाकडून कापडी पिशव्याचे वाटप यावेळी करण्यात आले. रामहरी साठे यांनी उपस्थितांना ‘ङ्कमाझी वसुंधराङ्कङ्क ची शपथ दिली. उपायुक्त संदिप खोत, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील, क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, उमाकांत गायकवाड, उपअभियंता राजेंद्र इंगळे, काशिद यांच्यासह १५० पोलीस, ३२५ महापालिका कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ४५ कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी सुमारे १२ टन कचरा गोळा केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला.
पालिकेच्या स्वच्छता मोहिमेत १२ टन कचरा उचलला
Reviewed by ANN news network
on
१/०८/२०२२ १०:०७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: