काळेवाडीत काँक्रिटचे रस्ते होणार; खासदार बारणेंच्या हस्ते भूमिपूजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्याप्रभाग क्रमांक 22 मधील काळेवाडी येथील रस्ते खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. शनिवारी या कामाचे भूमिपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. यावेळी गोरख पाटील, अनिल पालांडे, गणेश वायभट, एकनाथ मंजाळ, प्रदीप दळवी, शारदा वाघमोडे, संगीता पवार, तसलीम शेख, मीनाक्षी वर्हायड, अरुणा माने, नलिनी शिंदे, हनुमंत पिसाळ, सुनील पालकर, अरुण हुमणाबादे, दत्ता गिरी, सावता महापुरे, दीपक पवार, नरसिंग माने, लक्ष्मण सुरवसे, बळीराम सातपुते, हेमंत शिंदे, राहुल शिर्के, नवनाथ कोकणे, सुमन कोकणे, कविता रेवते, सीमा वाघमारे, अस्मिता बरडे, दशरथ गुरव, महेंद्र वराड व परिसरातील नागरिक उपस्थित होते. खासदार निधीतून काळेवाडीतील ज्योतिबा नगर भागातील सूर्यकिरण कॉलनी, मातृछाया कॉलनी, समता कॉलनी या कॉलन्यांमधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यांची गेली अनेक वर्षे दुरवस्था झाली होती. शेजारील प्रभागात सिमेंट काँक्रिटचे रस्ते होत असताना या परिसरात साधे डांबरीकरणही होत नव्हते. या कामासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते आणि विभागप्रमुख गोरख पाटील सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना निधी देण्यासाठी विनंती केली ती बारणे यांनी मान्य केल्याने ही कामे मार्गी लागणार आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांनी खासदार बारणे यांचा सत्कार केला.
काळेवाडीत काँक्रिटचे रस्ते होणार; खासदार बारणेंच्या हस्ते भूमिपूजन काळेवाडीत काँक्रिटचे रस्ते होणार; खासदार बारणेंच्या हस्ते भूमिपूजन Reviewed by ANN news network on १/१६/२०२२ ०९:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".