तळेगाव दाभाडे : पत्रकार दिनानिमित्त तळेगाव दाभाडे शहर परिसरातील अनेक संस्थांनी शहरातील पत्रकारांचा गौरव केला.
तर शहर पत्रकार संघाच्या सदस्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. हा कार्यक्रम साप्ताहिक अंबरच्या कार्यालयात झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी सतीश दिघे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, नगरसेविका शोभा भेगडे, बी.एम. भसे,सुनील वाळुंज, तात्यासाहेब धांडे, प्रभाकर तुमकर, अतुल पवार श्रीकांत चेपे आदी उपस्थित होते.
या सभेत स्वागत प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखळकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती सांगितली. एस एन गोपाळे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन अतुल पवार यांनी केले.
तळेगावात पत्रकारदिन साजरा
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ १०:५६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: