पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून शहराची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाली आहे. मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ती अशी वाढत राहिली तर, प्रशासनाला लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
गुरुवारी शहरात १ नवा ओमीक्रॉनचा रुग्ण आढळला असून कोरोनोचे ८१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. शहरातील एका व्यक्तीचा मृत्यू झालाआहे. सध्या शहरात २१६२ कोरोना रुग्ण आहेत. यापैकी १८८० गृह विलगीकरणात असून २८२ शहरातील विविध रुग्णालयात दाखल आहेत. आजवर शहरात २ लाख ८१ हजार ३२९ कोरोनाग्रस्त आढळले. त्यापैकी ४ हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला. आज ५ हजार १८५ जणांना लस देण्यात आली असून ७२५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ १०:५४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: