कष्टकरी उमेदवार उभे करणार : बाबा कांबळे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालक, फेरीवाले, घरेलू कामगार, बांधकाम मजदूर, असंघटित कामगार, बहुजन कष्टकरी जनतेच्या प्रश्नांकडे सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी कानाडोळा केला आहे. निवडणुकीत कष्टक-यांची मते पाहिजेत, मात्र त्यांची रखडलेली कामे करायला नको, अशी अवस्था आहे. त्यामुळे कष्टकèयांच्या प्रश्नावर, झोपडपट्टी, नागरी प्रश्न व मागासवर्गीय ओबीसीच्या सर्व प्रश्नांवर राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर कष्टकरी सक्षम राजकीय भूमिका घेणार आहेत. आगामी निवडणुकीत पर्यायी उमेदवार देऊन प्रस्थापितांपुढे आव्हान उभे करू, असे प्रतिपादन कष्टकèयांचे नेते बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले. मंगळवारी (दि. ४ जानेवारी) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, शिवशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे, अनिता सावळे, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, मराठा सेवा समितीचे सदाशिव तळेकर, घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, मधुरा डांगे, टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे शहराअध्यक्ष रमेश शिंदे, शोभा शिंदे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेडचे बाळासाहेब ढवळे, दिनेश यादव, मुकेश ठाकूर, जयश्री श्रीधर मोरे, मालन गवई, रंजीत शहा, सगुणा शिखरे, राणी तांगडे, सरस्वती गुजलोर, अशोक पासवान आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकाचा बिगुल वाजला आहे. याबरोबरच पुणे, मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर सह महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रामध्ये व मेट्रो सिटी म्हणून व मोठ्या शहरांमध्ये असंघटित कामगार कष्टकरी यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात कष्टकरी जनतेची संख्या १० लाखापेक्षा अधिक आहे. त्यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोेत. याबद्दल अधिक सविस्तर भूमिका मांडण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड शहर, पुणे, मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेबद्दल भूमिका जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
कष्टकरी उमेदवार उभे करणार : बाबा कांबळे कष्टकरी उमेदवार उभे करणार : बाबा कांबळे Reviewed by ANN news network on १/०४/२०२२ १०:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".