मैला शुद्धीकरण केंद्रांच्या तपासणीसाठी ७६ लाखांची उधळपट्टी?

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या १४ मैला शुद्धीकरण केंद्रांची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यासाठी महापालिका तब्बल ७६ लाख रुपये मोजणार आहे. मोनेरा लॅब या संस्थेला तीन वर्षे हे काम करण्यासाठी ही रक्कम दिली जाणार आहे. शहरात दररोज सुमारे २९० दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात १४ मैला शुद्धीकरण केंद्रे बांधण्यात आली आहेत. ती चालविणे आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करणे हे काम ठेकेदारांमार्फत करण्यात येते. या मैला शुद्धीकरण केंद्रांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने ठेकेदारांकडून निविदा मागविल्या. त्यासाठी ९८ लाख ११ हजार रुपये खर्च अपेक्षित धरला. चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यांपैकी ’मोनेरा लॅब’ या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा २२.५० टक्के कमी म्हणजेच ७६ लाख ३ हजार रुपये दराने निविदा सादर केली. तीन वर्षांसाठी या संस्थेला काम दिले जाणार आहे.
मैला शुद्धीकरण केंद्रांच्या तपासणीसाठी ७६ लाखांची उधळपट्टी? मैला शुद्धीकरण केंद्रांच्या  तपासणीसाठी ७६ लाखांची उधळपट्टी? Reviewed by ANN news network on १/०४/२०२२ १०:०६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".