पिंपरी : कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणा-यापिंपरी भाजीमंडईतील व्यापा-यांवर आणि ग्राहकांवर सोमवारी महापालिका प्रशासनाने कारवाई केली. मास्कचा वापर न करणा-या व्यवसायिक व नागरिकांना प्रत्येकी ५०० रुपये दंड केला आहे.
पिंपरी भाजीमंडईमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक भाजी खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यात नागरिकांनी व व्यापा-यांनी मास्क व सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाहणी केली असता त्यांना भाजी मंडईतील १४ व्यापारी व नागरिक मास्क न लावता भाजीविक्री व खरेदी करताना दिसून आले.
त्यामुळे विक्रेत्यांकडून ५०० रुपयांचा दंड आकारला आहे. एकूण ७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुख्य आरोग्य निरीक्षक झिटे, आरोग्य निरीक्षक योगेश फले, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी भाजीमंडईतील विक्रेते व ग्राहक यांच्यावर कारवाई
Reviewed by ANN news network
on
१/१०/२०२२ १०:५७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: