पिंपरी : देशातील छावणी परिषदांमध्ये वाहन प्रवेशशुल्क आकारणी बंद झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाने तशीसूचना दिल्यामुळे पुणे, खडकी आणि देहुरोड येथील शुल्क आकारणी बंद होणार आहे.
कॅन्टोन्मेंट कायदा २००६ नुसार ही आकारणी केली जात होती. जीएसटी लागू झाल्यानंतर प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्यात आली. लष्कर भागातून प्रवासी वाहतूक करणा-या व्यावसायिक वाहनांकडून २० ते ७० रुपयांचे प्रवेश शुल्क घेतले जात होते. मात्र, आता संरक्षण मालमत्ता विभागाने शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, शुल्क आकारणी बंद केल्याने छावणी परीषदांचे उत्पन्न घटणार आहे.
छावणी परिषदातील वाहन प्रवेश शुल्क बंद
Reviewed by ANN news network
on
१/१०/२०२२ १०:५२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: