राष्ट्रवादीच्या अनुसूचित जमाती सेल पदाधिका-यांना नियुक्तीपत्रे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुसूचित जमाती सेलच्या पदाधिका-यांना शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते नुकतीच नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी अरुण पवार, प्रा. विष्णू शेळके, शाम जगताप, तानाजी जवळकर, बाळासाहेब पिलेवार, विनोद कांबळे, उपाध्यक्ष शशिकांत घुले, शैलेश दिवेकर आदी उपस्थित होते. यावेळी चिंचवड विधानसभेच्या अध्यक्षपदी वनराज बांबळे, भोसरी विधानसभा कार्याध्यक्षपदी रोहित वाजे, महिला शहराध्यक्षपदी सुशीला जोशी, तर भोसरी महिलाध्यक्षपदी सोनाली साबळे, तर शहर युवती अध्यक्षपदी अनिता गभाले यांची नियुक्ती करण्यात आली. संजोग वाघेरे म्हणाले, आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी पक्षाने कायम लढा उभा केला आहे. महापालिकेतील विविध सुविधा, अनुदाने, योजनांचा लाभ आदिवासी बांधवानी घेतला पाहिजे. त्यासाठी मूळ प्रवाहात आले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ वालकोळी यांनी केले. तर आभार प्रभाकर घोटकर यांनी मानले.
राष्ट्रवादीच्या अनुसूचित जमाती सेल पदाधिका-यांना नियुक्तीपत्रे राष्ट्रवादीच्या अनुसूचित जमाती सेल पदाधिका-यांना नियुक्तीपत्रे Reviewed by ANN news network on १/१०/२०२२ ११:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".