गव्हाणी घुबडाच्या पिल्लांना जीवदान

वडिवळे : वडिवळेतील संगमेश्वर मंदिराजवळ असणा-या जुन्या पडक्या टाकीत रविवारी आढळलेल्या दुर्मिळ गव्हाणी घुबडाच्या तीन पिल्लांना मावळ वन्यजीवरक्षक पथकाच्या सदस्यांनी वाचवले आहे. वडिवळे नजिक संगमेश्वर मंदिराजवळ २० फूट उंचीवर असणा-या एका पाण्याच्या पडक्या टाकीत गव्हाणी घुबडाची तीन पिल्ले रविवारी आढळली होती. नवीन टाकी त्याठिकाणी बसविण्यासाठी जुनी टाकी खाली पाडली असता ग्रामस्थांना त्यात ही पिल्ले दिसली. टाकी खाली पडल्याने ती पिल्ले जखमी झाली होती. याबाबत ग्रामस्थ चेतन थोरवे यांनी वन्यजीवरक्षक पथकाशी संपर्क साधून उपचारासाठी विचारणा केली. वन्यजीवरक्षकचे अनिल आंद्रे, दक्ष काटकर, यश बच्चे, प्रमोद ओव्हाळ व जिगर सोलंकी यांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही पिलांना उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेत पाठवण्यात आले आहे.
गव्हाणी घुबडाच्या पिल्लांना जीवदान गव्हाणी घुबडाच्या पिल्लांना जीवदान Reviewed by ANN news network on १/१७/२०२२ १०:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".