सांगवी परिसरातील मनसे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

सांगवी : नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्याणी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेविका चंदा लोखंडे,राजू लोखंडे, अरुण पवार उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे पिंपळे गुरव, सांगवी भागात राष्ट्रवादी अधिक बळकट होणार आहे. प्रदीप गायकवाड यांच्यासोबत उदय ववले, राम कुंबरे, प्रकाश हादवे, मामा मिसाळ, दत्तोबा हतागळे व पवन साळुंके या मनसेच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सांगवी परिसरातील मनसे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सांगवी परिसरातील मनसे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश Reviewed by ANN news network on १/१७/२०२२ १०:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".