दुकानांवर मराठीत पाट्या लावा : लोणावळा शिवसेनेची मागणी

लोणावळा : राज्य सरकारने मंत्रीमंडळात महाराष्ट्र आस्थापना कायद्या अंतर्गत दुरुस्ती करत दुकानांच्या पाट्या मराठी देवनागरी अक्षरात करणे सक्तीचे केले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना लोणावळा शहरच्या वतीने लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी तसेच नवनियुक्त प्रशासकीय अधिकारी सोमनाथ जाधव यांना भेटून लोणावळ्यात सुद्धा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा अमंलबजावणी करत लोणावळा शहरातील सर्व दुकानांवर मराठी देवनागरी मोठ्या अक्षरात पाट्या लावण्यात याव्यात असे निवेदन देऊन सांगण्यात आले. यावेळी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, लोणावळा शहर समन्वयक जयवंत दळवी, युवासेना मावळ विधानसभा अधिकारी शाम सुतार, उपशहर प्रमुख संजय भोईर, युवासैनीक धीरज घारे आदी उपस्थित होते.
दुकानांवर मराठीत पाट्या लावा : लोणावळा शिवसेनेची मागणी दुकानांवर मराठीत पाट्या लावा : लोणावळा शिवसेनेची मागणी Reviewed by ANN news network on १/१७/२०२२ १०:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".