पिंपरी : पिंपरीतील हिंदुस्तान अॅन्टीबायोटिक्स कंपनीच्या साडेतीन एकर जागेवर क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय होणार आहे. या जागेचा नुकताच खरेदी व्यवहार पूर्ण झाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालय पुणे २ यांच्याकडूनप्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे पुणे येथील गोळीबार मैदानावर असलेले क्षेत्रीय कार्यालय आणि आकुर्डीतील कार्यालय अशी दोन्ही कार्यालये आता एकाच ठिकाणी होणार आहेत.
या कार्यालयासाठी हिंदुस्तान अॅन्टीबायोटिक कंपनीकडून साडेतीन एकर जमीन ४२.०६ कोटी रूपयांना खरेदी करण्यात आली आहे.
हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या जागेवर भविष्यनिर्वाह निधी कार्यालय होणार
Reviewed by ANN news network
on
१/१७/२०२२ १०:२२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: