भाजप जैन प्रकोष्ठ राज्यात राबविणार कॅन्सरमुक्त भारत अभियान

मुंबई : भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात कॅन्सरमुक्त भारत अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागीय संयोजकपदी पुणे जिल्हा उपाध्यक्ष गिरिश पारख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानाच्या पूुर्वतयारीची बैठक नुकतीत मुंबई भाजपा कार्यालयात प्रदेश जैन प्रकोष्ठाचे अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये ऑल इंडिया जैन माईनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी कॅन्सरमुक्त अभियान ही संकल्पना विशद करत याकरिता तयार करण्यात आलेल्या मेडिकल व्हॅन विषयी माहिती दिली. भाजपा प्रदेश कार्यालय सहमंत्री भरत राऊत, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, आमदार संजय केळकर, मुकुंद कुलकर्णी, प्रशांत मानेकर, गिरिष पारख, निरव देढिया, कार्यालयमंत्री मंगल शेठ आदी यावेळी उपस्थित होते. 26 जानेवारी 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील 131 ठिकाणी कॅन्सर तपासणी कॅम्प लावण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांची तपासणी करून कॅन्सर रुग्ण आढळल्यास त्यावर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार केले जाणार आहेत. या अभियानाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जनजागृती रॅली देखील काढण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा शहरात 21 जुलै रोजी तर वडगाव मावळ येथे 20 जुलै रोजी हा होणार असल्याची माहिती पारख यांनी दिली.
भाजप जैन प्रकोष्ठ राज्यात राबविणार कॅन्सरमुक्त भारत अभियान भाजप जैन प्रकोष्ठ राज्यात राबविणार कॅन्सरमुक्त भारत अभियान Reviewed by ANN news network on १/१६/२०२२ १०:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".