कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने नवीन भोसरी रुग्णालय ठेकेदाराच्या घशात घालणे लांबणीवर

पिंपरी : पालिकेने बांधलेल्या नवीन भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण केले जाऊ नये अशी मागणी शहरातील बहुसंख्य नागरिक, विरोधीपक्ष आणि सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवक करत असतानाही हे रुग्णालय खासगीकरणाच्या नावाखाली ठेकेदाराच्या घशात घालण्याचा निर्णय बहुमताच्या जोरावर सत्ताधा-यांनी सर्वसाधारण सभेत घेतला होता. मात्र, सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने या रुग्णालयाच्या खासगीकरणास तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यास नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेने भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामागील मोकळ्या जागेत रुग्णालयाची प्रशस्त इमारत उभारली आहे. त्या रुग्णालयाचे खासगीकरणास सर्वसाधारण सभेने ४ फेब्रुवारी २०१९ ला मंजुरी दिली आहे. त्या निर्णयास विरोधकांनी मोठा विरोध केला होता. शहरात मार्च २०२० ला कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. तेव्हापासून पालिकेच्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सध्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांवरही त्या रुग्णालयातच उपचार केले जात आहेत. कोरोना संक्रमणाची बाब लक्षात घेऊन हे रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यास देण्याच्या ठरावास तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने नवीन भोसरी रुग्णालय ठेकेदाराच्या घशात घालणे लांबणीवर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने नवीन भोसरी रुग्णालय ठेकेदाराच्या घशात घालणे लांबणीवर Reviewed by ANN news network on १/०४/२०२२ १०:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".