कोरोनाग्रस्त कर्मचा-यांना राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे रजा

पिंपरी : कोरोनाबाधित कर्मचा-यांच्या उपस्थितीबाबत राज्यशासनाने जारी केलेले आदेश महापालिकेच्या कर्मचा-यांनाही लागू आहेत; अशी माहिती पालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली. ते म्हणाले, तिस-या लाटेमध्ये शहरातील रुग्णालयामधील डॉक्टर्स, सहवैद्यक सेवा देणारे कर्मचारीाधिक प्रमाणात कोरोनाबाधित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि, त्यांचे लसीकरण झालेले असल्याने त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. बाधित कर्मचा-यांनी संसर्ग झाल्यानंतर १५ दिवसांहून अधिक रजा घेतल्याने कामाचा अतिरिक्त ताण वाढत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे त्यामध्ये जे वैद्यकीय कर्मचारी पॉझिटिव्ह असतील; मात्र त्यांना सौम्य लक्षणे असतील त्यांनी पाच ते सात दिवसांमध्ये कामावर रुजू व्हावे, तसेच ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत त्यांनी सात दिवसांनंतर लक्षणे नसतील तर कामावर रुजू व्हावे. ज्या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे आहेत त्यांची सात दिवसांनंतर आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. त्यामध्ये पुन्हा चाचणी सकारात्मक आली तर तीन दिवसांनी पुन्हा चाचणी करण्यात यावी. ती निगेटिव्ह आल्यानंतर कामावर रुजू व्हावे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाग्रस्त कर्मचा-यांना राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे रजा कोरोनाग्रस्त कर्मचा-यांना राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे रजा Reviewed by ANN news network on १/३१/२०२२ १०:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".