चिंचवड गावातील शिवरायांचे भित्तीचित्र अवमानकारक

राष्ट्रवादी आंदोलनाच्या पवित्र्यात
चिंचवड :चिंचवड गावातील चाफेकर चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या खांबावर लावण्यात आलेल्या शिवछत्रपती आणि जिजाऊ यांच्या भित्तिचित्राच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. हे भित्तिचित्र निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात सोमवारी चिंचवदमधील कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त राजेश पाटील आणि महापौर माई ढोरे यांना भेटले. येत्या आठ दिवसात या भित्तिचित्रासंदर्भातील त्रुटी दूर न केल्यास सत्ताधा-यांना जनक्षोभाला तोंड द्यावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक अॅड. संदीप चिंचवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चिंचवडे यांनी म्हतले आहे की,चाफेकर चौक, चिंचवड येथील उड्डाणपूलाच्या खालील स्तंभावर नुकत्याच लोकार्पण केलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यप्रेरिका जिजाऊ माँसाहेब यांचे भित्तीचित्र हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून महाराजांच्या व माँसाहेबांच्या प्रतिमेचा अवमान होईल अशा स्वरूपाचे आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन अरबी समुद्रात महाराजांचे त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या उंचीला साजेल असे भव्यदिव्य स्मारक उभे करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. तिथे दुसरीकडे आपण उड्डाणपुलाच्या खालील स्तंभावर इतक्या थोर व्यक्तिमत्वांचे भित्तिचित्र अशा स्वरूपात उभे करणे हा त्यांच्या प्रतिमेचा घोर अवमान करणे आहे. हे आम्ही एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून प्रशासन व सत्ताधारी पक्षाच्या निदर्शनास आणून देणे आमचे कर्तव्य समजतो. कारण त्या कलाकृती व एकंदरीत पूर्ण संकल्पनेविषयी तीव्र नाराजी ही स्थानिक जनतेने आमच्याकडे व्यक्तिगत स्वरूपात मांडली आहे. तरी या निवेदनाद्वारे आम्ही प्रशासनाला व सत्ताधारी भाजप पक्षाला विनंती करतो की त्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी आणि जनभावनेचा आदर ठेवत महाराजांचा व माँसाहेबांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
चिंचवड गावातील शिवरायांचे भित्तीचित्र अवमानकारक चिंचवड गावातील शिवरायांचे भित्तीचित्र अवमानकारक Reviewed by ANN news network on १/३१/२०२२ १०:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".