आ. लक्ष्मण जगताप यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : आगामी रेल्वे अर्थसंकल्पात पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म येथे नवीन रेल्वे जंक्शन उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा. अशी मागणी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
जगताप यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराची वाढ दर दशकामध्ये ७० टक्के इतक्या झपाट्याने होत आहे. तसेच जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असल्याने पुणे रेल्वे जंक्शनवर ताण येत आहे. त्यामुळे या परिसरात नवे जंक्शन उभारणे आवश्यक झाले आहे. पिंपरी येथील डेअरी फार्मसाठी संरक्षण विभागाला यापूर्वी देण्यात आलेली सुमारे ५० ते ६० एकर जमीन वापराविना पडून आहे. ही जमीन पुणे मुंबई रेल्वे लाईनला लागून असून मध्यवर्ती ठिकाणी आहे. नवीन जंक्शन विकसित करण्यासाठी या जमिनीचा वापर केल्यास पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांना सोयीचे होईल. त्यामुळे या जागेत पिंपरी जंक्शन विकसित करण्यासाठी निधी मंजूर व्हावा शिवाय चिंचवड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
पिंपरीतील मिलीटरी डेअरी फार्मच्या जागेत नवे रेल्वे जंक्शन उभारा
Reviewed by ANN news network
on
१/३१/२०२२ १०:१७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: