वेटलिफ्टर ओंकार बोरकर याचा सत्कार

लोणावळा : लोणावळा महाविद्यालयात शिक्षण घेणारा आणि आंतरविभागीय वेटलिफ्टिंगमधील द्वितीय क्रमांकाचा विजेता ओंकार बोरकर याचा सत्कार लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी नगराध्यक्षा जाधव यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करीत भविष्यात महाविद्यालयास सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. लोणावळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नव्याने बनवण्यात आलेले जॉगिंग ट्रॅक,क्रिकेट, कबड्डी, खोखो, नेमबाजी अशा विविध खेळासाठीचे सुसज्ज क्रिडांगण तसेच बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, चेस व योग हॉल जिमखाना विभागाची पाहणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केली. सोबतच महाविद्यालयात नव्याने सुरू होत असलेल्या कम्प्युटर लॅब व विज्ञान विभागाच्या ग्रंथालय प्रयोगशाळा सह महाविद्यालय कॅन्टीन व मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी बोलताना नगराध्यक्षा जाधव यांनी महाविद्यालयालगत असलेल्या महामार्गाच्या बाजूला एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली झालेली अतिक्रमणे व अस्वच्छता दूर करण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. यावेळी आंतरविभागीय वेटलिफ्टिंग द्वितीय क्रमांकाचा विजेता ओंकार बोरकर याचा सत्कार करण्यात आला.
वेटलिफ्टर ओंकार बोरकर याचा सत्कार वेटलिफ्टर ओंकार बोरकर याचा सत्कार Reviewed by ANN news network on १/०५/२०२२ ०९:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".