हौसाबाई थोरात यांचे निधन

पिंपरी : निगडी प्राधिकरण येथील हौसाबाई थोरात यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे, असा मोठा परिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सदस्य विनायक थोरात आणि उद्योजक बापूसाहेब थोरात यांच्या त्या आई तर भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात आणि उद्योजक आनंद थोरात यांच्या त्या आजी होत. शेतकरी कुटुंबातील असलेल्या हौसाबाई थोरात यांनी मुलांना सुसंस्कारीत केले. त्यांच्या विचारांनुसार आचरण करीत त्यांच्या मुलांनी तसेच आता नातू असलेले अमोल आणि आनंद थोरात यांनी वाटचाल सुरू ठेवली आहे.
हौसाबाई थोरात यांचे निधन हौसाबाई थोरात यांचे निधन Reviewed by ANN news network on १/१७/२०२२ १०:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".