कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांचा दोन महिने पगार नाही; ११५ जणांचे कामबंद आंदोलन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या कर्मचा-यांनी गेले २ महिने ठेकेदाराने पगार न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. यामध्ये जिजामाता आणि थेरगाव रुग्णालयातील कर्मचा-यांचा समावेश आहे. या डॉक्टर, नर्स, आया अशा सर्व श्रेणीतील ११५ कर्मचा-यांनी सोमवारी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. श्रीकृपा एजन्सी या ठेकेदाराने पगार थकविल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. या आंदोलनामुळे वैद्यकीय सेवेत व्यत्यय निर्माण झाला. १ ऑक्टोबरपासून श्रीकृपा एजन्सीच्या माध्यमातून आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत आहोत. तेव्हापासून आम्ही एकही दिवस बंद पुकारलेला नाही. गेले २ महिने आम्हाला पगार मिळालेला नाही. पगार कधी देणार याचे उत्तरही दिले जात नाही. याबाबत ठेकेदार महापालिकेला विचारा असे सांगतो. तर, महापालिका ठेकेदाराकडे बोट दाखविते. कामावरुन काढण्याची धमकी दिली जाते. आम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. त्यामुळे काम बंद करायचे नाही. रुग्णसेवा करायची पण आमची पगार होणार नाही का, नोव्हेंबर, डिसेंबरचा पगार नाही. जानेवारीचे १५ दिवस उलटून गेले. त्यामुळे घर चालवायचे कसे असा प्रश्न या कर्मचा-यांनी उपस्थित केला आहे.
कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांचा दोन महिने पगार नाही; ११५ जणांचे कामबंद आंदोलन कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांचा दोन महिने पगार नाही; ११५ जणांचे कामबंद आंदोलन Reviewed by ANN news network on १/१७/२०२२ १०:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".