गिरीश प्रभुणे यांना महाराष्ट्र कार्यगौरव पुरस्कार

पिंपरी : क्रांतिवीर चाफेकर समितीचे अध्यक्ष, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. चाफेकर वाडा ,चिंचवड येथे जनसेवा बँकेचे अध्यक्ष अॅड सतिश गोरडे व संस्थेचे अध्यक्ष अशोक टाव्हरे यांच्या हस्ते प्रभुणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संतकृपा ट्रॅव्हल्सचे दशरथ पानमंद, अॅड.सतिश गोरडे, युवा उद्योजक दत्तकुमार लोखंडे ,शांताराम दौंडकर, निवृत्ती बोराटे,राजेश बिडकर यांचाही पिंपरी चिंचवड गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच अशोक टाव्हरे यांनी संपादित केलेल्या गौरव स्मरणिकेचेह प्रकाशन करण्यात आले. प्रभुणे यांनी शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनाथांना मदत,विद्यार्थी वह्या वाटप, आरोग्य शिबीर असे विधायक उपक्रम राबविले जातात याचे कौतुक करून गुणवंतांचा सत्कार करण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले. डॉ. शकुंतला बन्सल,रविंद्र नामदे,संजय कुलकर्णी,गतिराम भोईर,मधुसुदन जाधव,अशोक पारखी ,शरद जाधव,निता मोहिते,हर्षदा धुमाळ,सचिन सुपेकर उपस्थित होते.
गिरीश प्रभुणे यांना महाराष्ट्र कार्यगौरव पुरस्कार गिरीश प्रभुणे यांना महाराष्ट्र कार्यगौरव पुरस्कार Reviewed by ANN news network on १/०८/२०२२ ०९:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".