तळेगावात दिव्यांगांसाठी तपासणी शिबिर

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सहाय्यक साधने व कृत्रिम अवयव वाटपपूर्व तपासणी शिबीर शुक्रवारी व शनिवारी तळेगाव दाभाडे येथे पार पडले. आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने हे शिबीर झाले. येथील नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणात शिबिराचे आयोजन केले होते. याचा लाभ १४३८ ज्येष्ठ नागरिक आणि १५८४ दिव्यांगांनी घेतला. यावेळी आमदार सुनिल शेळके, सुधीर भागवत, चंद्रकांत लोहारे, गुणेश बागडे, बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, सुभाष जाधव, संतोष भेगडे, अरुण माने,सुनिल दाभाडे, सुवर्णा राऊत, नारायण ठाकर, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, निशा पवार,ज्योती शिंदे, तुषार काळोखे, आदि उपस्थित होते. या शिबिराच्या निमित्ताने तालुक्यातील जेष्ठ व दिव्यांग नागरिकांशी आमदार सुनिल शेळके यांनी संवाद साधला. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिरात तपासणी व नोंदणी करून जेष्ठ नागरिकांच्या गरजेनुसार त्यांना चालण्याची काठी,कोपर काठी, अल्युमिनियम कुबड्या, चार पायांची काठी, घडीचे वॉकर, चष्मा, श्रवण यंत्र,फोल्डिंग व्हील चेअर, कृत्रिम दात, कमोड व्हील चेअर, संपुर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा आदि साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग नागरिकांसाठी एडीप योजनेअंतर्गत फोल्डिंग चेअर, तीन चाकी सायकल, विविध कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे.
तळेगावात दिव्यांगांसाठी तपासणी शिबिर तळेगावात दिव्यांगांसाठी तपासणी शिबिर Reviewed by ANN news network on १/०८/२०२२ ०९:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".