भाजपने शहरातील जनतेच्या भावनांशी खेळ करणे थांबवावे : राजू मिसाळ

पिंपरी :पालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी गेल्या दोन वर्षापासून महापालिकेच्या अधिकार कक्षेत नसताना, आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असणा-या विषयाबाबत ठराव करीत आहेत. पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत सदनिकांना मिळकत करमाफी, कोरोना काळात शहरातील गरिबांना तीन हजाराची आर्थिक मदत, अनधिकृत बांधकामाना १०० टक्के शास्तीकर माफी असे ठराव करून आपणांस गरिबांबाबत कळवळा असल्याचे दाखविले जात आहे. सत्ताधा-यांनी महापालिकेच्या अधिकारात असणारे ठराव करावे. जनतेच्या भावनांशी खेळ करणारे ठराव करून राजकारण करणे सोडावे; असे पालिकेतील विरोधीपक्ष नेता राजू मिसाळ यांनी म्हटले आहे. मिसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हतले आहे की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सरकारला अडचणीत आणण्यासाठी ठराव केले जात आहेत. कोरोना काळामध्ये राज्य सरकारच्या वतीने गोरगरीब कष्टक-यांना मदत देण्याचे निर्णय घेण्यात आला. त्याही वेळी पालिकेत कोणतीही आर्थिक मदत देण्याची तरतूद नाही, असे असताना स्टंटबाजी केली. मदत देणार असे जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात मदत दिलीच नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ केला. मिळकतकर माफीचा निर्णय ही असाच आहे. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी आणि राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी ठराव केले जात आहेत. २०१७च्याापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला सत्ता द्या, शास्तीकराचे आणि अनधिकृत बांधकामाचे भूत घालवू, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर हे दोन्ही प्रश्न अर्धवट ठेवण्यात आलेले आहेत. ही या शहरातील सुजाण जनता जाणते आहे. शंभर टक्के शास्तीकर माफीचे आश्वासन देऊन केवळ एक हजार स्केअर फुट घराचा कर माफ केला.अनधिकृत बांधकामांसाठीची नियमावली अत्यंत किचकट केली, त्याचा किती लोकांनी लाभ घेतला हे भाजपने सांगावे; असा सवाल मिसाळ यांनी केला आहे.
भाजपने शहरातील जनतेच्या भावनांशी खेळ करणे थांबवावे : राजू मिसाळ भाजपने शहरातील जनतेच्या भावनांशी खेळ करणे थांबवावे : राजू मिसाळ Reviewed by ANN news network on १/१२/२०२२ ११:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".