शिवसेना, राष्ट्रवादीचा आक्षेप असलेल्या कामाला स्थायीची मंजुरी

पिंपरी : शिवसेना गटनेता राहुल कलाटे आणि आणि राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सांगवी ते किवळे रस्त्याचे डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे आणि अनुषांगिक कामे ही अनावश्यक असून ती केवळ निवडणूक निधी गोळा करण्यासाठी केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र, या विरोधाला न जुमानता बुधवारी झालेल्या स्थायीसमितीच्या बैठकीत आयत्यावेळी आणलेल्या विषयाद्वारे या कामांना मान्यता देण्यात आली. स्थायीसमितीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला की नाही याचा तपशील सभा ऑनलाईन झाल्यामुळे मिळू शकला नाही. सहा महिन्यात हे काम केले जाणार असून त्यासाठी २१ कोटी ४० लाख १२ हजार रुपये खर्च येणार आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सांगवी ते किवळे रस्त्याचे डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे आणि अनुषांगिक कामे करण्यासाठी निविदा मागविली होती. निविदेची रक्कम ३० कोटी ९४ लाख ९५ हजार रुपये इतकी होती. या निविदाप्रक्रियेत आर.एम.के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (३१.७६ टक्के), अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (२७.९९ टक्के) आणि श्री गणेशा कन्स्ट्रक्शन यांनी (२७.३९ टक्के) सहभाग घेतला. त्यापैकी आर.एम.के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराची निविदा रकमेच्या ३१.७६ टक्के कमी दराची निविदा आहे. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी १ जानेवारी २०२२ रोजी ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्चेसह २१ कोटी ४० लाख १२ हजार रुपयात काम करुन घेतले जाणार आहे. ६ महिन्यात काम पूर्ण केले जाणार आहे. या ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.
शिवसेना, राष्ट्रवादीचा आक्षेप असलेल्या कामाला स्थायीची मंजुरी शिवसेना, राष्ट्रवादीचा आक्षेप असलेल्या कामाला स्थायीची मंजुरी Reviewed by ANN news network on १/१२/२०२२ ११:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".