लोणावळा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा लोणावळा शहर यांच्या वतीने आज लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये नाना पटोलेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा याबाबत निवेदन देण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा घेत नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
याप्रसंगी लोणावळा नगरीच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, गटनेते देविदास कडू, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे, मा. नगरसेवक राजाभाऊ खळदकर, युवा वारियर्स पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक प्रथमेश पाळेकर, नगरसेवक ललित सिसोदिया, अमित गंधे, प्रदिप थत्ते, सचिन ढकोरिया, संतोष जंगले, श्रवण चिकणे, चैतन्य दळवी, आयुष कांक्रिया, शुभम दाभाडे, शुभम जाधव, संकेत निकुडे, यश वाळंज, ओमकार पाटील, आकाश राथोड, सचिन उंबरदंडे, कावेरी काळे, राधिका संपत, प्रणाली बना व भाजयुमोचे तसेच शहर भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले यांच्या विरोधात लोणावळ्यात भाजपचे आंदोलन
Reviewed by ANN news network
on
१/१९/२०२२ १०:३९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: