पिंपरी : थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये २२ वर्षीय अविवाहित तरुणीच्या (ओव्हरी)डिंबग्रंथींमधून ११.२ किलो वजनाची कर्करोगाची गाठ काढण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.
अंकिता (नाव बदलले आहे) ही २२ वर्षांची तरुणी असून ती पुण्यातील एका लष्करी कुटुंबातील आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान बैठ्या जीवनशैलीमुळे तिचे वजन खूप वाढू लागल्याने त्यांनी लोहगाव येथील डॉक्टरांना दाखविले असता त्यांनी तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तिच्या सोनोग्राफीत तिच्या ओव्हरीमध्ये ४५ सेमी गाठ दिसून आली. त्यामुळे त्या डॉक्टरांनी तिला बिर्ला हॉस्पिटलमधील डॉ. मधुलिका सिंग यांना दाखविण्याचा सल्ला दिला. डॉ.सिंग यांनी तिची तपासणी केल्यावर गायनेक ऑन्को सर्जन डॉ. निखिल पर्वते यांची भेट घेण्यास सांगितले.
मुलीचे वय फक्त २२ वर्षे होते आणि ती अविवाहित होती. त्यामुळे ही केस जरा गुंतागुंतीची झाली होती. डॉक्टरांनी तपासणीअंती त्या मुलीवर फर्टिलिटी स्पॅरिंग ऑन्को सर्जरी केली,ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ३ तास १५ मिनिटे चालली, त्यावेळी तातडीने रक्त देण्याचीही गरज भासली नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिस-या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
आदित्य बिर्ला रुग्णालयात तरुणीच्या शरीरातून ११ किलो वजनाची गाठ काढली
Reviewed by ANN news network
on
१/१९/२०२२ १०:३८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: