लोणावळा : लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करत भाजपा काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करत आहे. चुकीच्या शब्दांचा वापर करत असल्याचा आरोप करत शहर काँग्रेसच्या पदाधिका-यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या फोटोला जोडे मारले.
तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत भाजपाच्या वाचाळांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव निखिल कविश्वर, माजी नगरसेवक नासिर शेख, रवी सलोजा, सुनिल मोगरे, महंमद मण्यार, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, आब्बास खान, बक्षी साहेब, मंगेश बालगुडे, प्रफुल्ल रजपूत, मारुती राक्षे, आकाश परदेशी, अमोल शेडगे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोणावळा शहर काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन
Reviewed by ANN news network
on
१/१९/२०२२ १०:४१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: