‘मास्तरचं पोर’ पुस्तकाचे प्रकाशन

पिंपरी : चिंचवड येथे रविवारी ‘मास्तरचं पोर’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते पार पडले. शालेय स्पर्धा परीक्षा समुपदेशक शिरीष पडवळ या पुस्तकाचे लेखक आहेत. पैस रंगमंच, प्रीमिअर प्लाझा इमारत, पुणे - मुंबई हमरस्ता, चिंचवड येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. किसन चौधरी होते. कार्यक्रमास श्रीकांत चौगुले, निखिल लंभाते आणि पुस्तकाच्या प्रकाशिका रुपाली अवचरे उपस्थित होत्या. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सुरक्षा नियमांचे पालन करून मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल नवलपुरे यांनी आभार मानले. कृतज्ञता ही मानवी जीवनातील सर्वात सुंदर भावना असून ‘मास्तरचं पोर’ या आत्मकथनामध्ये त्याचे प्रतिबिंब उमटले आहे;असे विचार राजन लाखे यांनी यावेळी व्यक्त केले.
‘मास्तरचं पोर’ पुस्तकाचे प्रकाशन ‘मास्तरचं पोर’ पुस्तकाचे प्रकाशन Reviewed by ANN news network on १/१०/२०२२ १०:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".