स्मार्टसिटीचे पूर्ण झालेले प्रकल्प नागरिकांसाठी खुले करा : महापौर

पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे पूर्ण झालेले प्रकल्प नागरिकांसाठी खुले करावेत. आणि पूर्णत्वाकडे जात असलेले प्रकल्प लवकर पूर्ण करावेत; अशा सूचना महापौर माई ढोरे यांनी गुरुवारी स्मार्टसिटीच्या अधिका-यांना दिल्या. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या सुरु असलेल्या एबीडी व पॅन सिटी कामांचा पाहणी दौरा दि. ०६ व ०७ जानेवारी रोजी संचालक मंडळाने केला. त्यावेळी महापौरांनी अधिका-यांना या सूचना दिल्या. यावेळी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक सचिन चिखले, शहर अभियंता तथा सहमुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) राजन पाटील, सहशहर अभियंता तथा जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, शिर्के कंट्रक्शनचे मॅनेजर नितीन कदम, प्रकल्प व्यवस्थापक लावण आदी उपस्थित होते. राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर येथील संपूर्ण एबीडी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर, पिंपळे गुरव येथील जिजामाता उद्यान, परिसरातील रस्ते, चौकांमध्ये सुरु असलेली कामे, कृष्ण विहार चौक येथील आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तयार केलेले प्लेस मेकिंग, चिल्ड्रेंन प्ले ऐरिया, सुदर्शन चौकातील सेव्हन स्टार रोड, योगा पार्क, बीआरटी रोड, कोकणे चौकातील रस्ते, टॉयलेट ब्लॉक, फुट पाथ तसेच रहाटणी चौकात सुरु असलेल्या कामांना संचालकांनी भेट देऊन पाहणी केली. नामदेव ढाके म्हणाले प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या रस्त्यांना जागेची अडचण असल्यास स्थानिक नगरसदस्यांच्या मदतीने सोडवून स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा. सचिन चिखले म्हणाले, अनेक ठिकाणी या नव्याने झालेल्या रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याचे पाहावयास मिळते. हे सर्व अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई करावी.
स्मार्टसिटीचे पूर्ण झालेले प्रकल्प नागरिकांसाठी खुले करा : महापौर स्मार्टसिटीचे पूर्ण झालेले प्रकल्प नागरिकांसाठी खुले करा :  महापौर Reviewed by ANN news network on १/०७/२०२२ १०:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".