सत्ता जाणार याची खात्री झाल्यानेच घाईगडबडीत विकासकामांची उद्घाटने! माया बारणे यांच्याकडून भाजपला घरचा आहेर
पिंपरी : महापालिकेतील सत्ता जाणार असल्याची खात्री भाजपला झाल्यामुळे घाईगडबडीत विकासकामांची उद्घाटने उरकून घेतली जात आहेत; अशा शेलक्या शब्दात भाजपच्याच नगरसेविका माया बारणे यांनी स्वपक्षाला घरचा अहेर दिला. गुरुवारी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाणीवपूर्वक टाळले जाते. निमंत्रणपत्रिका देण्याची केवळ औपचारिकता पार पाडली जाते.त्यांची वेळ घेऊन कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण बुधवारी पार पडले. त्याबाबत नाराजी व्यक्त करताना नगरसेविका बारणे यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली.त्या म्हणाल्या की, अजित पवार यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन व्हावे यासाठी महापौरांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यासाठी रीतसर पत्रही दिले. मात्र महापौरांनी अचानक मंगळवारी सायंकाळी पाचला कार्यक्रमपत्रिका पाठविली.
अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत याचा विसर महापौरांना पडला आहे. त्यांना कार्यक्रमासाठी बोलवायचे असेल तर त्यांची वेळ घेणे आवश्यक आहे.
मात्र जाणूनबुजून त्यांची वेळ घेतली जात नाही. अचानक कार्यक्रमाचे निमंत्रण देत औपचारिकता पार पडली जाते, अशी टीका त्यांनी केली.
सत्ता जाणार याची खात्री झाल्यानेच घाईगडबडीत विकासकामांची उद्घाटने! माया बारणे यांच्याकडून भाजपला घरचा आहेर
Reviewed by ANN news network
on
१/०७/२०२२ १०:३७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: